May 8, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट चे कोषाध्यक्ष मा. श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते पेरीविंकल च्या विद्यार्थ्यांचा सन्मान!!!

सुस (ता. पुणे):

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सुस येथील विद्यार्थी शाडू मातीपासून गणेशमूर्ती घडविण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
या विजयी विद्यार्थ्यांना माननीय गोविंद देव गिरीजी महाराज व श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या सोहळ्यात शेकडो विद्यार्थी, पालक व मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरणपूरक उपक्रमातून या विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती साकार करून उत्तम कलाकृती दर्शवली होती. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जाणीव निर्माण करणे हा होता. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाडू मातीचा वापर करून आकर्षक व कलात्मक मूर्ती घडवल्या.

काहींनी पारंपरिक गणेशरूप तर काहींनी आधुनिक कलात्मकतेसह मूर्ती साकारल्या. परीक्षकांनी या सृजनशीलतेला व कल्पकतेला भरभरून दाद दिली.
त्याचा बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्ताने माननीय गोविंद देव गिरीजी महाराज म्हणाले
“गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर तो संस्कारांचे पर्व आहे. विद्यार्थ्यांनी शाडू मातीच्या मूर्ती तयार करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. हा प्रयत्न समाजासाठी आदर्श ठरेल.”

श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले –
“लहानग्या मुलांनी इतक्या सुंदर व देखण्या कलाकृती घडवल्या, ही बाब कौतुकास्पद आहे. पेरिविंकल शाळा विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
या यशामागे शाळेच्या प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. त्याचा विद्यार्थ्यांना कायम पाठिंबा असतोच. तसेच संस्थेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व सौ. शिवानी बांदल व मुख्याध्यापक यांचे सातत्यपूर्ण पाठबळ मिळाल्याने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास लाभला.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षक श्री. सचिन खोडके, सौ. स्मिता श्रीवास्तव व सौ. नेहा माळवदे यांच्या सहयोगाने व कला शिक्षक शिवराज कदम यांच्या अचूक मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा मिळाली व हे विद्यार्थी बक्षीसपात्र ठरली असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजेंद्र बांदल सर यांनी केले.

हा यशाचा टप्पा शाळेसाठी अभिमानाची बाब असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
पालकांनीही आनंद व्यक्त करत म्हटले की, “अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास व पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना वाढीस लागते.”
उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांचे कौतुक करून शाळेच्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या. भविष्यातही हे विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेचे नाव मोठे करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

You may have missed