पाषाण :
अंतर्गत स्वच्छता ही सेवा २०२५ अभियानाच्या निमित्ताने “एक दिन, एक घंटा, एक साथ” या संकल्पनेवर आधारित स्वच्छता उपक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला.
हा उपक्रम Armament Research and Development Establishment (ARDE), पाषाण यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण यांनी सहभाग घेऊन नागरिकांसमवेत परिसरातील स्वच्छता केली.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छोत्सव – स्वच्छता ही सेवा २०२५ या अभियानाचा भाग म्हणून नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी आणि सामूहिक सहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी पाषाण परिसरातील नागरिक, विद्यार्थी व स्थानिक स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून परिसर स्वच्छ ठेवण्याचा आणि प्लास्टिकमुक्त बनवण्याचा संकल्प केला.
स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून समाजसेवेचा एक भाग आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी अंकथी राजु (विशिष्ट वैज्ञानिक, निदेशक, ए.आर.डी.ई.)श्री आर एस राव, श्री राजकुमार, श्री पाढी, श्री सुनील काशीकर , श्री प्रतीक पटेल ,एन के ढवळे,श्री रेंगे, श्री सुरेश रोकडे, श्री राहुल म्हस्के, श्री विजय शिंदे, श्री हर्षद थिटे, श्री गणेश चांदेरे, श्री महेश खुळे, श्री हितेश पारगे, श्री आर झेड शेख, श्री सारंग मंथनवार, श्री विजय रणपिसे , श्री सचिन धावडे , श्री नवनाथ काळे,श्री विशाल थोरात ,श्री अनिल घोडकी, श्री कानिफनाथ तारू, श्री संतोष पवार,श्री अमित गायकवाड ,श्री निलेश देहारकर, श्री अनिकेत सोलंकी ,श्री आशिष जाधव ,समस्त कामगार संघटना आणि कर्मचारी,अधिकारी, महिला कर्मचारी वर्ग उपस्थित होते.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले