बाणेर :
बाणेर परिसरातील ईक्विलाईफ सोसायटीतर्फे पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष मा. श्री. बाबुरावजी चांदेरे यांना मानाचे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. सोसायटी सदस्यांनी त्यांच्या कार्याचे, नागरिकाभिमुख दृष्टिकोनाचे आणि विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचे मनःपूर्वक कौतुक करत हा सन्मान दिला.
सोसायटी सदस्यांच्या म्हणण्यानुसार, चांदेरे साहेबांनी परिसरातील प्रत्येक समस्येकडे जबाबदारीने लक्ष देत तातडीने मार्ग काढण्याची तत्परता दाखवली आहे. नागरिकांच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांना सहृदयतेने आणि लोकाभिमुख दृष्टिकोनातून सोडवण्याची वृत्ती, सचोटी, प्रामाणिकपणा आणि जनतेशी आत्मीयतेने जोडलेले नाते याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.
चांदेरे साहेबांच्या वतीने सन्मानपत्र स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी ईक्विलाईफ सोसायटीच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “हा सन्मान आमच्यासाठी अभिमान आणि प्रेरणेचा क्षण आहे. नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि व्यक्त केलेली आपुलकी ही आमच्या कार्याला बळ देणारी शिदोरी आहे. समाजकारणाचा केंद्रबिंदू म्हणजे जनतेची सेवा असून, आम्ही सदैव जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहू,” असे त्यांनी सांगितले.
चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील अनेक नागरी प्रश्न मार्गी लागले असून, सोसायटीच्या विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होऊ शकल्या आहेत. त्यामुळेच नागरिकांचा त्यांच्या कार्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
या सन्मानामुळे नागरिक-प्रतिनिधी यांच्यातील परस्पर विश्वास आणि सहकार्य अधिक दृढ होण्यास हातभार लागेल, असा विश्वास सोसायटी सदस्यांनी व्यक्त केला.



More Stories
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा