बाणेर :
बाणेर येथील ऋतुगंध पार्क व अजिंक्य पार्क सोसायटी परिसरात माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या कर्मचारीवर्गाच्या सहकार्याने आणि सोसायटीतील नागरिकांच्या सहभागातून भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
नागरिकांच्या मागणीनुसार आणि परिसरातील वाढत्या अस्वच्छतेच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली.
सोसायटी परिसरात साचलेला कचरा, झाडाझुडपी आणि अस्वच्छता दूर करण्यात आली असून, नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. स्वच्छतेनंतर परिसर अधिक सुबक आणि आरोग्यदायी झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
या मोहिमेमुळे सोसायटीतील अस्वच्छतेची समस्या दूर झाली असून, नागरिकांकडून चांदेरे यांच्या पुढाकाराचे कौतुक करण्यात येत आहे.





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*