बाणेर, पॅनकार्ड रोड :
कळमकर विहीर – अंजोर सोसायटी परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत होता. ड्रेनेज लाईनमधील पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या प्रयत्नामुळे आता या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होणार असून पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने नवीन लाईन टाकण्याची प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
२५ वर्षे जुनी पाईपलाईन सिमेंट काँक्रेट रस्त्याखाली गेल्याने ती पूर्णपणे जीर्ण झाली होती. यामुळेच परिसरात दूषित पाणीपुरवठा होत होता. या संदर्भात माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करून लेखी निवेदन दिले होते.
या निवेदनावर तात्काळ कार्यवाही करत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता मा. श्री. नंदकुमार जगताप यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. “सदर भागातील जुन्या पाईपलाईनचा प्रश्न लक्षात घेऊन पुढील काही दिवसांत नवीन पाईपलाईन टाकली जाईल,” असे त्यांनी आश्वासन दिले आहे.
नवीन पाईपलाईन टाकल्यामुळे कळमकर विहीर व अंजोर सोसायटी परिसरातील नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणीपुरवठा मिळणार आहे. यामुळे परिसरातील आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.




More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी