February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

‘मिशन निर्मल’ स्वच्छता अभियानाची घोषणा –अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या पुढाकाराने बाणेर परिसरात भव्य उपक्रम

बाणेर :

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात स्वच्छतेचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यासाठी ‘मिशन निर्मल – स्वच्छता अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिका आणि आदर पुनावाला यांच्या सहकार्याने तसेच अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा शुभारंभ मा. ना. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कामकाज मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते होणार असून, मा. श्री. धीरजजी घाटे (अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, पुणे शहर) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी भाजपचे अनेक मान्यवर, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

📅 दिनांक – रविवार, दि. २१ सप्टेंबर २०२५
⏰ वेळ – सकाळी ९.३० वाजता
📍 ठिकाण – पॅनकार्ड रोड, बाणेर

या अभियानाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा उपक्रम तात्पुरता नसून पुढील चार महिन्यांमध्ये बाणेर,बालेवाडी, सुस,महाळुंगे, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी परिसरातील अस्वच्छ भाग, गल्ली, रस्ता स्वच्छ केला जाणार आहे. यासाठी अमोल बालवडकर फाउंडेशनचे २० स्वच्छता दूत, पालिकेचे कर्मचारी, आदर पूनावाला यांच्या सहकार्याने पुणे शहरातील सर्वाधिक स्वच्छ परिसर बनविला जाणार आहे.

नागरिकांना प्रत्यक्ष स्वच्छतेत सहभागी करून घेत परिसर स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे. “स्वच्छ शहर – सुंदर शहर” हा संदेश घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न या अभियानाद्वारे केला जाणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिकांना कचरा व्यवस्थापन, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. समाजातील सर्व घटकांचा सक्रीय सहभाग घडवून आणण्याचा हेतू असल्याचे आयोजक माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.