बाणेर :
बाणेर रोड पीएमपीएमएल डेपो प्रवेशद्वाराजवळ काल सोमवारी रात्री एका पीएमपीएमएल बसचे अचानक रस्त्याच्या मधोमध ब्रेकडाउन झाल्याने जवळपास दोन किलोमीटरपर्यंत भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
परिस्थितीची माहिती मिळताच माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पीएमपीएमएल कर्मचारी व वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून बस बाजूला करण्यासाठी तातडीने वायर रोप उपलब्ध करून दिले तसेच एका क्रेनचीही व्यवस्था केली. काही वेळातच बस रस्त्यावरून बाजूला करण्यात आली आणि वाहतूक सुरळीत सुरू झाली.
या कार्यवाहीदरम्यान बाणेर ट्रॅफिक विभागातील पोलीस हवालदार संदेश दापकेकर, तसेच महाळुंगेचे नागरिक तुषार पाडळे व ऋषिकेश पाडळे यांनीही सक्रिय मदत केली.
यावेळी उपस्थित नागरिक, वाहतूक पोलिस व पीएमपीएमएल कर्मचारी यांनी अमोल भैय्यांच्या तत्परतेचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.



More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!