सुस :
सुस गावामध्ये माजी चेअरमन गोपीतात्या शा. चांदेरे आणि पुणे शहर टपाल (पश्चिम विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील नागरिकांसाठी दि. १३/०१/२०२५ ते दि. १८/०१/२०२५ रोजी सकाळी १० ते ५ दरम्यान आधार कार्ड शिबिर आणि मोफत सुकन्या समृद्धी योजना खाते तसेच नवीन मतदार नोंदणी शिबिर सुरू करण्यात आले आहे.
या शिबिराची उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील भाऊ चांदेरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सुस परिसरात नागरिकांना आधार कार्ड, मतदार नोंदणी आणि सरकारी योजनांचा लाभ घेता यावा म्हणून गोपीतात्या चांदेरे यांनी पुढाकार घेत अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे. यामुळे नागरिकांना सुविधांचा लाभ घेता येईल.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन मामा चांदेरे, सुखदेव चांदेरे, गोवर्धन बांदल, गणेश सुतार, किशोर चांदेरे, निलेश चांदेरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थळ : राज टेलर शेजारी, गोपीनाथ चांदेरे यांच्या निवासस्थानी सुसगाव
संपर्क : 9518751880/9921070707





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*