बाणेर :
पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.बाबुरावजी चांदेरे साहेब आणि राहुलदादा बालवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने आज बाणेर भागातील वेलवर्थ सोसायटीमधील मतदारांशी संवाद साधला.
नामदार चंद्रकांत दादा पाटील हे महायुतीचे उमेदवार असून त्यांच्या माध्यमातून विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी नेहमी मदत होत असते. आम्ही सोसायटी मधील विविध अडचणी मार्गी लावत असतो. म्हणूनच आपल्या परिसराचा विकास व्हावा म्हणून महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना आपणास विक्रमी बहुमताने विजयी करायचे आहे. हे लक्षात घेऊन चंद्रकांत दादांना मतदान करावे असे आवाहन करत आहे.
– समीर चांदेरे
युवक अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर
यावेळी सोसायटीमधील नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार मा.चंद्रकांतदादा यांना २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी क्रमांक २ चे बटण दाबून विजयी करण्याचा निर्धार केला!



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी