बाणेर :
बाणेर येथील पॅनकार्ड रोड नजीक असलेल्या ओकवूड हिल्स सोसायटी समोरील तुकाई माता मंदिर व कल्पतरू सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथ वर पावसाळ्यात रानटी गवत वाढल्याने परिसरातील नागरिकांची चालताना गैरसोय होत होती हि गैरसोय दूर व्हावी म्हणून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या प्रयत्नातून या परिसराची पाहणी करून साफसफाई आणि वाढलेले झाडे, झुडूपे यांच्या छाटणीचे काम सुरू करण्यात आले.
या परीसरात पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.बाबुराव चांदेरे साहेबांच्या पुढाकाराने पॅनकार्ड रोड नजीक असलेल्या ओकवूड हिल्स सोसायटी समोरील तुकाई माता मंदिर व कल्पतरू सोसायटीकडे जाणाऱ्या परिसरात रस्ता, पथदिवे आणि फुटपाथचे पूर्ण झाले आहे. येत्या आठवड्याभरात येथील साफसफाई आणि स्वच्छतेचे काम पूर्ण होणार असल्याने परिसराचे वैभव वाढणार आहे.
येथील रस्त्यावरून अनेक माता भगिनी, जेष्ठ नागरिक, लहान मुले येत जात असतात त्यामुळे येथे साफसफाई करून घेण्यात आली आहे. परंतू या रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांमुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे, त्यामुळे अशा सर्व तळीरामांना आवाहन करतो की तुकाई माता मंदिर तसेच आजूबाजूच्या परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच समाजातील सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण इथे दारू पिणे बंद करावे, यापुढे जर कोणी या परिसरात दारू पिताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईलच आणि कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही..
– समीर चांदेरे
युवक अध्यक्ष
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!