November 22, 2024

Samrajya Ladha

परिसरातील ट्रॅफिक समस्या, रस्ते दुरुस्ती व इतर मागण्यासाठी अमोल बालवडकर यांचे भर पावसात जोरदार आंदोलन, निवेदन जाळून केला निष्क्रिय प्रशासनाचा जाहीर निषेध!

बाणेर :

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे आणि पाषाण येथील नागरिकांच्या समवेत आज परिसरातील ट्रॅफिक समस्या सोडविण्यासाठी, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आणि पर्यायी रस्त्यांचे काम करण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात बाणेर येथील राधा चौकामध्ये अनेक महिला भगिनींच्या व नागरिकांच्या उपस्थितीत अमोल बालवडकर यांच्या वतीने भर पावसात निषेध आंदोलन करण्यात आले.

परिसरातील रस्ते खड्डेमुक्त करणे, ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करणे, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, बॅरिकेड बसविणे, NH-4 येथे नवीन अंडरपास होणे, NH-4 सर्विस रस्ता सुधारणे, बालेवाडी- वाकड रस्ता लवकर सुरू करणे, म्हाळुंगे- नांदे रस्ता सुधारणे आणि झोपलेल्या प्रशासनाला जागे करणे यासाठी हे विराट निषेध आंदोलन करण्यात आले.

जबाबदार अधिकारी आज उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे निवेदन जाळून त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या मागण्या या कायमच राहतील आणि जेव्हा जेव्हा वेळ पडेल तेव्हा नागरिकांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येईल : अमोल बालवडकर (माजी नगरसेवक)