May 8, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

नामदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीने आयोजित मंगळागौर आणि पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

बाणेर :

कोथरूड विधानसभा आमदार कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीने महिलांसाठी आयोजित मंगळागौर आणि पाककला स्पर्धा २७ जुलै २०२४ रोजी, कुंदन गार्डनला आणि २७-२८ जुलै अलंकार हॉल कोथरूड येथे संपन्न झाली.

यावर्षी श्रावण महोत्सव आषाढ महिन्यात होणार असून स्पर्धेची अंतिम फेरी ८ ऑगस्ट २०२४ कोथरूडला होणार आहे. गतवर्षीप्रमाणेच कोथरूड आणि बाणेर या दोन्ही ठिकाणी आपली मंगळागौरीच्या खेळांची व पाककलेची स्पर्धा संपन्न झाली. २७ जुलै बाणेर – बालेवाडी – पाषाण- सुतारवाडी येथील कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी भाजपा कोथरूड मंडळ अध्यक्ष सचिन पाषाणकर , मा. नगरसेवक अमोल बालवडकर, मा. नगरसेविका स्वप्नाली सायकर , मा. नगरसेविका ज्योती कळमकर, मोरेश्वर बालवडकर, उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर, कविता निंबोळकर, कल्याणी टोकेकर, वैशाली कमाजदर, निकिता माठडे, स्नेहल चौघुले, प्राजक्ता देवस्थळी, अदिती करंबेळकर, प्रियांका आदी मान्यवर उपस्थित होते.

 

You may have missed