August 9, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

* राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत सूस शाखेचा संस्कृत गीतात द्वितीय, तर हिंदी देशभक्तिपर गीतात तृतीय क्रमांक तर बावधन शाखेने पटकावले उत्तेजनार्थ पारितोषिक !*

पुणे :

भारत विकास परिषद, कोथरूड शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय समूहगान स्पर्धा २०२६ मध्ये चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सुस शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल, शिस्तबद्ध आणि प्रभावी सांघिक सादरीकरणातून उल्लेखनीय यश संपादन केले. पुण्यातील दिग्गज व नामांकित शाळांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत एकूण १५ शाळांनी सहभाग नोंदविला होता. अशा चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पेरिविंकल सुस शाखेने मिळविलेले हे दुहेरी यश विशेष कौतुकास्पद आणि अभिमानास्पद ठरले आहे.

 

या स्पर्धेत पेरिविंकलच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत समूहगान तसेच हिंदी देशभक्तिपर समूहगान या दोन्ही प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने, सुरेल सांघिक सादरीकरणाने, तालबद्धता, उच्चारांची अचूकता आणि आत्मविश्वासपूर्ण गायनाने परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणातून भारतीय संस्कृती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना प्रभावीपणे व्यक्त झाली.
*संस्कृत समूहगान स्पर्धेत पेरिविंकल सुस शाखेने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक, तर हिंदी देशभक्तिपर समूहगान स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आणि बावधन शाखेने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली*. या दोन्ही यशाबद्दल विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पुण्यातील १५ नामांकित शाळांच्या सहभागात मिळविलेले हे यश पेरिविंकल सुस शाखेच्या सांघिक प्रयत्नांची आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची साक्ष देणारे ठरले आहे.

या यशामध्ये आरुषी पाखरे, मेनुका ठकुला, प्रत्युष सस्मल, किशोरी राऊत, स्वराज मोरे, स्वप्नील जाधव, स्वानंद पाखरे, आदित्य अडाव, आर्या चव्हाण आणि आदित्य ढमाले या विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग राहिला. या सर्व विद्यार्थ्यांनी नियमित सराव, मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट सांघिक भावनेच्या जोरावर आपल्या सादरीकरणाला प्रभावी उंची प्राप्त करून दिली. त्यांच्या या कामगिरीमुळे *पेरिविंकलच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कला, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय वाटचालही पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.*

या उल्लेखनीय यशामागे शाळेच्या प्राचार्या सौ निर्मल पंडित यांचे प्रेरणादायी नेतृत्व, दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याची सातत्यपूर्ण भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जावे, त्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या क्षमतेची सर्वोत्तम कामगिरी करावी, यासाठी प्राचार्या सातत्याने प्रेरणा व मार्गदर्शन देत असतात. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य दिशा मिळाली आणि या दुहेरी यशाची वाटचाल अधिक सुकर झाली.

तसेच शाळेच्या उपप्राचार्या योगिता ढाणे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सातत्याने प्रोत्साहन देत आवश्यक ते सहकार्य केले. समन्वयकांनी केलेले प्रभावी नियोजन, योग्य समन्वय आणि व्यवस्थापन यामुळे स्पर्धेच्या तयारीपासून अंतिम सादरीकरणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.

संगीत शिक्षक पवन करडे व अक्षय कबाडे यांनी विद्यार्थ्यांना नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि अथक परिश्रमातून स्पर्धेसाठी सक्षमपणे तयार केले. गीताची निवड, स्वर-तालातील अचूकता, समूहातील एकसंधता, उच्चार, सादरीकरणातील भाव , वेशभूषा आणि आत्मविश्वास यावर त्यांनी घेतलेली मेहनत या यशामागील महत्त्वाचा आधार ठरली. तसेच स्वप्निल ढाले यांनी विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी व स्पर्धेसाठी प्रोत्साहन देऊन सहकार्य केले . सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन व सहकार्य देणारे पालक यांचेही मोलाचे योगदान लाभले.

या अभिमानास्पद यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल सर तसेच संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल व प्राचार्या निर्मल पंडित यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीतून संस्थेचा नावलौकिक वाढविला असून, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातही पेरिविंकलचे विद्यार्थी उत्तुंग कामगिरी करू शकतात, हे या यशातून सिद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्था सदैव त्यांच्या पाठीशी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संगीत शिक्षकांचे, समन्वयकांचे, सहकारी शिक्षकांचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे विशेष कौतुक केले. त्यांच्या मते, “पारितोषिक हे यशाचे एक प्रतीक आहे; मात्र त्यामागील सातत्यपूर्ण सराव, शिस्त, संघभावना, समर्पण आणि आत्मविश्वास हीच खरी यशाची ताकद आहे.” विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करून पेरिविंकलचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

पेरिविंकल सुस व बावधन शाखेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे दुहेरी यश म्हणजे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि संस्थेच्या प्रेरणादायी नेतृत्वाचा सुंदर संगम आहे. संस्कृत गीतात द्वितीय आणि हिंदी देशभक्तिपर गीतात तृतीय क्रमांक मिळवत या विद्यार्थ्यांनी पेरिविंकलच्या शिरपेचात ‘सुरांचा’ आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व विजेते विद्यार्थी, संस्थेचे संस्थापक, प्राचार्या, उपप्राचार्या, समन्वयक, संगीत शिक्षक, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, विद्यार्थ्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. 💐🏆🎶🇮🇳
“सुरांतून उमटला देशप्रेमाचा स्वर… आणि पेरिविंकल सुसच्या शिरपेचात रोवला गेला मानाचा दुहेरी तुरा!” 🇮🇳🎶🏆

 

You may have missed

भाजपा कोथरूड उत्तर मंडल अंतर्गत सुस-म्हाळुंगे प्रभागाध्यक्षपदी श्री. सचिन भीमा पाडाळे यांची निवड पाषाण : भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड उत्तर मंडल अंतर्गत सुस-म्हाळुंगे प्रभागाध्यक्ष म्हणून श्री. सचिन भीमा पाडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी जाहीर केली. यावेळी श्री. सचिन भीमा पाडाळे यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देताना अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी सचिन पाडळे यांचा सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनुभव पक्षाचा संघटनात्मक विस्तार करण्यासाठी व पक्ष बांधणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांच्याकडून ‘राष्ट्रप्रथम’ या भावनेतून भारतीय जनता पार्टीचा विचार सर्वदूर पोहचवून पक्षाने दिलेल्या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी होईल याची खात्री बाळगली.