पाषाण :
भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड उत्तर मंडल अंतर्गत सुस-म्हाळुंगे प्रभागाध्यक्ष म्हणून श्री. सचिन भीमा पाडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी जाहीर केली.
यावेळी श्री. सचिन भीमा पाडाळे यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देताना अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी सचिन पाडळे यांचा सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनुभव पक्षाचा संघटनात्मक विस्तार करण्यासाठी व पक्ष बांधणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांच्याकडून ‘राष्ट्रप्रथम’ या भावनेतून भारतीय जनता पार्टीचा विचार सर्वदूर पोहचवून पक्षाने दिलेल्या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी होईल याची खात्री बाळगली.



More Stories
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान
*पेरिविंकलमधील सुस शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हातून साकारला ‘पर्यावरणपूरक गणराया’!* *शाडू माती गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेतून परंपरेसोबत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश!!!*