बालेवाडी :
बालेवाडी परिसरातील वाढत्या कचरा समस्येबाबत जनसेवक भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल सरचिटणीस श्री. मोरेश्वर शिवाजीराव बालवडकर यांनी सहाय्यक आयुक्त मा. श्री. विजय नायकल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. हायवे लगतच्या सर्व्हिस रोडवर उभारलेल्या कचरा डेपोमधील कचरा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पसरल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सदर ठिकाणी कचऱ्याचा प्रचंड साठा झाल्याने ये-जा करणे कठीण झाले आहे. तसेच परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
यासंदर्भात बालवडकर यांनी प्रशासनाकडे काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये रस्त्यावर पसरलेला कचरा तात्काळ उचलणे, कचरा डेपोची नियमित साफसफाई व योग्य व्यवस्थापन करणे, दुर्गंधी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे तसेच डेपो परिसर पत्रा किंवा हिरव्या जाळीने झाकून कचरा नागरिकांच्या नजरेआड ठेवणे यांचा समावेश आहे.
दरम्यान, संबंधित प्रशासनाला स्पष्ट इशारा देत बालवडकर म्हणाले की, पुढील १५ दिवसांत या समस्येवर समाधानकारक तोडगा न काढल्यास स्थानिक नागरिकांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन करण्यात येईल.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!