पुणे, दि. 4 मे 2026 :
भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुरड्या मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी व युवती संघटना, पुणे शहर तीव्र शब्दांत निषेध करत आहे.
या अमानवी कृत्याविरोधात आवाज उठवण्यासाठी व पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी *सोमवार, दि. 4 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता, डेक्कन परिसरातील गुडलक हॉटेल जवळील ‘कलाकार कट्टा’ येथे मेणबत्ती श्रद्धांजली व जाहीर निषेध आंदोलन* आयोजित करण्यात आले होते.
या घटनेतील नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळावा, अशी *मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे* करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी पुणे शहर अध्यक्ष हसीना इनामदार, कार्याध्यक्ष वैशाली कमाजदार, युवती अध्यक्ष लावण्या शिंदे यांच्यासह स्नेहल कांबळे, स्वाती चिटणीस, अमृता रानवडे, नीता कुलकर्णी, आनायता कपूर, वैशाली सातव, रुही सय्यद तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पीडितेला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे मत यावेळी कार्याध्यक्ष वैशाली कमाजदार यांनी व्यक्त केले.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!