बालेवाडी :
पुणे महानगरपालिका आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी परिसरातील सोसायटी स्तरावर SIR मॅपिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी दुपारी बालेवाडी येथील ‘४३ प्रिवेट ड्राईव्ह’ सोसायटीत पहिल्या कॅम्पद्वारे करण्यात आला.
सहाय्यक आयुक्त नायकल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘४३ प्रिवेट ड्राईव्ह’ सोसायटीचे चेअरमन तसेच बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे उपाध्यक्ष मोरेश्वर बालवडकर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
या कॅम्पमध्ये निवडणूक अधिकारी मांजरे साहेब, पडाळे साहेब तसेच बीएलओज यांनी नागरिकांना SIR मॅपिंग प्रक्रियेसाठी मार्गदर्शन व मदत केली. नंदन स्पेक्ट्रम, ब्लिस अव्हेन्यू, संस्कृती होम्स आणि साई सिलिकॉन येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोरेश्वर बालवडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच आशिष कोटमकर, दफेदार सिंह आणि रमेश रोकडे हे फेडरेशनतर्फे उपस्थित होते.
दरम्यान, रविवारीपासून बालेवाडी परिसरातील विविध सोसायटींमध्ये असे कॅम्प आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिका आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी