May 1, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट्स मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा!!!

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या बावधन, सुस, पिरंगुट, पौड कोळवण व माले या सर्व शाखेत आज दि.1मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सर्व शाखांमध्ये ध्वजरोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा राजेंद्र बांदल सर , संस्थेच्या संचालिका सौ रेखा बांदल, शिवानी बांदल, सर्व शाखांच्या प्रमुख प्राचार्या सौ निर्मल पंडित, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, समन्वयक, शिक्षकवृंद आणि सर्व शाखांचे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बावधन शाखेत शाळेच्या संचालिका सौ रेखा बांदल, सूस शाखेत प्रमुख प्राचार्या निर्मल पंडित, पिरंगुट शाखेत मुख्याध्यापिका पूनम वर्मा तर पौड माले व कोळवण शाखेत पौड शाखेच्या मुख्याध्यापिका वीणा कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .

सर्व शाखांमध्ये महाराष्ट्राच्या भगव्या झेंड्याचे ध्वजारोहण करून महाराष्ट्राची आन बान व शान जपून गर्जा महाराष्ट्र माझा या राज्य गीताचा जयजयकार करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर दुमदूमला होता.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कामगारदिनानिमित्त संस्थेच्या संचालिका सौ रेखा बांदल यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र देशा पवित्र देशा…. मंगल देशा… अशा विविध गुणांनी नाटलेल्या या महाराष्ट्राचा सर्वांनाच अभिमान असला पाहिजे असे सांगून या महाराष्ट्राच्या मातीचे सगळ्यावर खूप ऋण आहेत व हे ऋण फेडायचे असतील तर या मातीचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. या महाराष्ट्राच्या मातीला संत भूमी म्हंटले जाते असे सांगून या मातीत आपण जन्म घेतला याचा अभिमान प्रत्येकाने बाळगायला हवा असे प्रतिपादन संस्थेच्या संचालिका सौ रेखा बांदल यांनी केले.

आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सर्वांना महाराष्ट्र राज्याची थोडक्यात माहिती देऊन सर्वात जास्त रोजगाराच्या संधी या महाराष्ट्रात असल्याने आजचा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करण्याचा जणू हा एक योगायोगच आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा राजेंद्र बांदल सर यांनी केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे प्रमुख प्राचार्या निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली बावधन शाखेच्या उपमुख्याध्यापक काकोली घोष, पिरंगुट शाखेच्या मुख्याध्यापिका पूनम वर्मा तसेच पौड शाखेच्या मुख्याध्यापिका वीणा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख शिरीन काझी,सायली गायकवाड , सचिन खोडके, नेहा माळवदे, स्मिता श्रीवास्तव, सना इनामदार, पल्लवी नारखेडे व नेत्रा काकडे यांच्या सहकार्याने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आले होते.

संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. कामगार दिनानिमित्त सर्व मावशी कामगार यांना अल्पोपहार देण्यात आला.