बाणेर :
योगीराज पतसंस्थेला सन 2025 – 26 या आर्थिक वर्षात 4 कोटी 55 लाख रुपयांचा नफा प्राप्त झाल्याचे संस्थेच्या संचालक मंडळाच्या आर्थिक आढावा बैठक प्रसंगी संस्थापक, अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी जाहीर केले. तसेच याप्रसंगी मुलखेडचे नवनिर्वाचित सरपंच राहुल तापकीर यांचाही संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, संस्थेला महाराष्ट्रातील आदर्श पतसंस्था म्हणून राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक प्रगतिचे सातत्य राखण्याची जबाबदारी महत्वाची होती. संस्थेच्या दोनच शाखांमध्ये 31 मार्च 2026 अखेर 162 कोटी रुपयांच्या ठेवी, सभासद कर्ज 130 कोटी, इतर बँकेतील 68 कोटी रुपयांची गुंतवणूक, खेळते भांडवल 213 कोटी, एकत्रित व्यवसाय 192 कोटी तसेच 67.69% सी डी रेशो राखण्यात संस्थेने यश मिळविले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सभासदांना 15% लाभांश देण्यात येईल. तसेच चालू वर्षी 400 कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवले आहे. संस्थेला मिळालेले यश हे संस्थेचे सर्व खातेदार, संचालक व स्टाफ यांच्यामुळेच मिळाले आहे असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, शंकरराव सायकर, संचालिका रंजना कोलते, सहयोगी संचालिका निकिता माताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सिमा डोके, भाग्यशाली पठारे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.


More Stories
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान