बाणेर :
पाषाण–बाणेर लिंक रोड येथे नुकत्याच सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्राच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व परिसर व्यवस्थापनाबाबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही संयुक्त बैठक येत्या 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता औंध रोड क्षेत्रिय कार्यालयात होणार असल्याची माहिती नगरसेववक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी दिली.
नगरसेवक सनी निम्हण यांनी संबंधित विभागांना पाठवलेल्या पत्रव्यवहार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही बैठक आयोजित करण्यात आली असून, संभाव्य वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, अतिक्रमण तसेच परिसर व्यवस्थापनाच्या अडचणी टाळण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा होणार आहे.
या बैठकीस महापालिका, वाहतूक पोलिस आणि सर्व संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. या परिसरातील नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन निम्हण यांनी केले आहे.



More Stories
बालेवाडीतील राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे स्नेहवनमध्ये ‘बालदीपोत्सव ५’ उत्साहात साजरा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील १८० मुलांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित..
*औंध-बोपोडीतील चिमुकल्यांच्या कल्पकतेला मिळाली नवी झळाळी!**मोफत आकाशकंदील कार्यशाळेतून बालसर्जनशीलतेला प्रोत्साहन**नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंडिया २०२६’चा ऐतिहासिक सोहळा दिमाखात संपन्न!