बाणेर :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते प्रभागातील विकासकामांचा सविस्तर प्रगती अहवाल आज जिजाऊ बंगला, पुणे येथे प्रकाशित करण्यात आला.
यावेळी प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा, समस्या व सूचनांचा समावेश असलेला “जनहितनामा” देखील प्रसारित करण्यात आला. येणाऱ्या काळात प्रभागातील नागरिकांचे जीवनमान अधिक उंचावण्यासाठी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा जनहितनामा तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. गायत्री मेढे-कोकाटे, श्री. बाबुराव चांदेरे, सौ. पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रगती अहवालामध्ये प्रभागात आजपर्यंत करण्यात आलेली विकासकामे, राबविण्यात आलेले विविध जनकल्याणकारी उपक्रम तसेच भविष्यातील विकासाचा ठोस आणि नियोजनबद्ध आराखडा सविस्तरपणे मांडण्यात आला आहे. विकासासाठी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ठाम संकल्प यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी