सूस :
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रचाराला वेग आला असून, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. लहू बालवडकर हे नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. जनतेच्या समस्या समजून घेणे व त्या सोडवणे हीच आमची जबाबदारी असून जनसेवाच आमचे ध्येय असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
याच अनुषंगाने सुस येथील विधात वस्ती परिसरातील एरो होम्स सोसायटीमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. गणेश कळमकर आणि इतर उमेदवार तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सोसायटीतील नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक व मूलभूत सुविधांबाबत विविध समस्या मांडल्या. उमेदवारांनी या सर्व प्रश्नांकडे काळजीपूर्वक लक्ष देत, त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचा ठाम शब्द नागरिकांना दिला. यावेळी नागरिकांनी देखील उमेदवारांचे आपुलकीने स्वागत करत मनापासून पाठिंबा देण्याची भावना व्यक्त केली.
भेटीदरम्यान प्रभागातील आतापर्यंत झालेल्या विकासकामांची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या विकासात्मक, सर्वसमावेशक व लोकाभिमुख धोरणांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली.
“विकासासाठी तुम्ही आम्हाला साथ द्या, पुढील पाच वर्षे आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे उभे राहून काम करू,” असा विश्वास व्यक्त करत कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.



More Stories
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा