बालेवाडी :
बालेवाडी येथील मिटकॉन परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी निवडणूक पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर यांचा सन्मान करत या निवडणुकीत खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास आणि मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आगामी विजयासाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी मंगू तुलसानी, सौरभ चतुर्वेदी, प्रतीक तुलसानी, किशन तुलसानी, राजकुमार गायकवाड, विश्वजीत रे, पवन पवार, आकाश पवार, तन्मय काजबे, औदुंबर कदम आदी मित्र व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे अमोल बालवडकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. विकासाभिमुख नेतृत्वाला संधी देण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केल्याने परिसरात सकारात्मक आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!