बाणेर :
बाणेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला कार्यध्यक्षा सौ. पूनम विशाल विधाते यांच्या सासरे कै. बाबुराव चिंधु विधाते व दिर कै. संतोष बाळासाहेब विधाते यांच्या तृतीय पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने भावपूर्ण वातावरण पार पडले.
या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने ह.भ.प. माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कीर्तनातून उपस्थित भाविकांना अध्यात्मिक अनुभूती लाभली. भावपूर्ण कीर्तनामुळे वातावरण भक्तिमय झाले, उपस्थितांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंचा प्रवाह उमटला.
या सोहळ्याला भोर-राजगड मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, ह.भ.प. समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, हभप पांडुरंग आप्पा दातार, मुळशी पंचायत समितीच्या माजी सभापती सारिकाताई शंकर मांडेकर, माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी नगरसेवक रोहिणी चिमटे, बाणेरचे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य अशोक मुरकुटे, पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक दत्ता गायकवाड, ह.भ.प. मारुती कोकाटे, ह.भ.प. निवृत्ती आबा कोकळेकर, गोसेवक ह.भ.प. संजय बापू बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर कार्यध्यक्ष प्रदीप दादा देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, भाजप नेते गणेश काळमकर, युवा नेते राहुलदादा बालवडकर, विशाल गांधीले, जीवन चाकणकर, संजय निम्हण, अशोक दळवी, युवा नेते श्याम जगताप तसेच पंचक्रोशीतील सर्व वारकरी सांप्रदायातील मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी पुण्यस्मरण सोहळ्यात एकत्र येऊन कै. बाबुराव चिंधु विधाते व कै. संतोष बाळासाहेब विधाते आदरांजली वाहिली आणि श्रद्धांजली व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी विधाते परिवाराचे मनःपूर्वक कौतुक केले.




More Stories
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा