बालेवाडी :
बालेवाडी येथील मंत्रा मोनार्क सोसायटीमध्ये दसऱ्याचा सण अत्यंत उत्साही वातावरणात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सोसायटीच्या सांस्कृतिक समितीने तब्बल १२ फूट उंच आणि आकर्षक असा रावणाचा पुतळा तयार केला होता. या सर्जनशील पुतळ्याने सर्वांचे लक्ष वेधले.
दसऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रावण दहन कार्यक्रमात सर्व रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. फटाक्यांची आतषबाजी आणि विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला. रावण दहनासोबतच पारंपरिक पोशाख, संगीत, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी या उत्सवाची रंगत अधिक वाढवली.
लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मिळून हा सण साजरा केल्याने सोसायटीमध्ये एकात्मतेचे आणि सहकार्याचे वातावरण अनुभवायला मिळाले.






























More Stories
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*
*पिरंगुटच्या पेरिविंकलमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; नागपंचमीच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा!!*