February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे भव्य इनडोअर नवरात्री दांडिया उत्सव उत्साहात संपन्न

बालेवाडी :

बालेवाडी येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित भव्य इनडोअर नवरात्री दांडिया उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. तीन दिवस चाललेल्या या उत्सवात नागरिकांनी दांडियाच्या तालावर थिरकत नवरात्रीची अनोखी मजा अनुभवली. उत्सवाचे वैशिष्ट्य ठरलेले लकी ड्रॉ आणि बक्षिसांचा सोहळा यामध्ये दररोज पाच विजेत्यांना चांदीच्या दांडिया प्रदान करण्यात आले. त्याशिवाय पैठणी व नथ यांसारखी आकर्षक बक्षिसे देण्यात आल्याने नागरिकांचा आनंद द्विगुणित झाला. अशा प्रकारे तीन दिवसांत एकूण पंधरा विजेत्यांना गौरविण्यात आले. माता-भगिनी, तरुणाई तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत नवरात्रीचा जल्लोष अनुभवला.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर, अभिज्ञा भावे आणि अश्विनी महांगडे यांची उपस्थिती. त्यांच्या शुभेच्छा व संवादामुळे सोहळ्याचे वैभव अधिकच वृद्धिंगत झाले. या कार्यक्रमाला आमदार शंकर मांडेकर, मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, मा. नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, मा. नगरसेवक प्रमोद  निम्हण, मा. स्वीकृत नगरसेवक बालम सुतार, सरला बाबुराव चांदेरे, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष समीर चांदेरे, कार्याध्यक्ष मनोज बालवडकर पाटील, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते प्रकाश बालवडकर, हभप संजय बालवडकर, पो. पाटील आनंदा कांबळे तसेच राष्ट्रवादी महिला पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे उत्सवाचा गौरव अधिकच वृद्धिंगत झाला.

असा उत्साह, आनंद व परंपरेचा संगम असलेला हा भव्य इनडोअर नवरात्री दांडिया उत्सव नागरिकांच्या मनात कायमची अविस्मरणीय आठवण म्हणून कोरला गेला.

दांडिया स्पर्धेत खालील बक्षिसे देण्यात आली :
सर्वोत्तम गट नृत्य (Best Group Dance) –
💃 Dance Paglu Group
💃 Bhoomi Group
💃 RIT Group

सर्वोत्तम जोडी नृत्य (Best Couple Dance) –
💑 आदेश आणि पूनम
💑 सुमनचंद्र जैशील कुलकर्णी
💑 सायली रोहन बोरगे

सर्वोत्तम बाल नृत्य (Best Child Dance) –
👧 आदिया शेख
👧 आर्या देशमुख
👧 माहि धेंडे
👦 वीर पाटील

सर्वोत्तम महिला नृत्य (Best Female Dance) –
💃 श्रेया खाडेकर
💃 तन्वी भाटिया
💃 प्रियांका यादव

सर्वोत्तम ज्येष्ठ नागरिक नृत्य (Best Senior Citizen Dance) –
👵 अंजली पुस्तकें
👵 भारती जगदाळे
👵 मालती पांडे