बाणेर, दि. २५ सप्टेंबर :
बाणेर येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आला असून त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. आधीच सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला असताना, अशा बेजबाबदार कृतीमुळे नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी गंभीर भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, “मुख्य रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यामागे कोणाचा हात आहे? त्याला कोण पाठबळ देते? हे तातडीने तपासले जावे.”
राडारोडा साफ करण्यात प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अन्यथा येथील नागरिकांच्या संयमाचा अंत होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
👉 नागरिकांचा प्रश्न :
आधीच वाहतुकीची कोंडी, त्यात राडारोड्याचा अडथळा
जबाबदारांवर कारवाईची मागणी




























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*