बालेवाडी :
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बालेवाडी येथील श्री. शिवराज मित्र मंडळाने आपल्या ३२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने मंडळाने यंदा शिव मंदिराचा भव्य देखावा सादर केला असून, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावर्षी गणेशोत्सवात मंडळाने ‘डीजे मुक्त’ गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणूकही ढोल-ताशा पथकाच्या गजरात काढण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.श्री.शिवराज मित्र मंडळ यंदाचे मंडळाचे अध्यक्ष – कु.प्रसाद भरत बालवडकर हे आहेत.
मंडळाने सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष प्राधान्य दिले आहे. गेल्या ८ वर्षांपासून ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ या उपक्रमांतर्गत महिलांसाठी महाआरतीचे आयोजन केले जाते. यावर्षी शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी ही महाआरती होणार असून, यात परिसरातील शेकडो महिला सहभागी होऊन गणरायाची मनोभावे पूजा करतात.
या व्यतिरिक्त, मंडळाने सामाजिक भान जपत विविध उपक्रम राबवले आहेत. यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, आरोग्य शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि गणेश जयंतीनिमित्त महाप्रसादाचे वाटप केले जाते.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये मंडळाकडून महिलांसाठी खास ‘खेळ पैठणीचा’ आणि लहान मुलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. या खेळांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवले जाते. तसेच परिसरातील विविध पुरुष व महिला भजनी मंडळांच्या उपस्थितीमध्ये भजन संध्या चे आयोजन केले आहे. या सर्व उपक्रमांमुळे बालेवाडीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी