बालेवाडी :
बालेवाडी परिसरातील नागरिकांना दीर्घकाळ भेडसावत असलेल्या वाहतुकीच्या समस्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस राहुल बालवडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने अखेर वाटीका सोसायटी ते रणभूमी स्पोर्ट्स अकॅडमी, पारितोष सोसायटी व मंत्रा मोनार्च सोसायटीला जोडणाऱ्या 30 मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम जलदगतीने सुरू झाले आहे.
या रस्त्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे राजेश हिरामन बालवडकर यांनी स्वतःचा बंगला स्वखुशीने व परवानगीने पाडून रस्त्याला मार्ग मोकळा करून दिला. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या शेतीच्या अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांशी संवाद सुरू असून, त्यावरही लवकरच तोडगा निघेल.
हा रस्ता थेट मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे बालेवाडीतील नागरिकांना मुख्य रस्त्याशी जलद व सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल. वाहतूक कोंडीपासून दिलासा, प्रवासाचा वेळ कमी होणे आणि विकासाची नवी दारे उघडणे – हे सर्व या रस्त्यामुळे साध्य होणार आहे.
राहुल बालवडकर यांनी सांगितले की, “अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आज हा रस्ता आकार घेत आहे. पूर्ण झाल्यानंतर बालेवाडीच्या वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडणार असून परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल.”
या कामासाठी सहकार्य करणाऱ्या पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांचे त्यांनी आभार मानले. “बालेवाडीच्या विकासासाठी माझा संघर्ष आणि वचनबद्धता कायम राहील,” असे बालवडकर यांनी स्पष्ट केले.




More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी