बालेवाडी :
बालेवाडी-बाणेर परिसरातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते श्री मोरेश्वर बालवडकर यांनी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री विजय नायकल यांच्याकडे तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्याची मागणी केली होती.
या मागणीची तत्काळ दखल घेत सहाय्यक आयुक्त श्री विजय नायकल, श्री लांडे, श्री रामदासजी आणि श्री भागवतजी यांनी संबंधित परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्यांची पाहणी केली. पाहणीदरम्यान नागरिकांच्या अडचणी जाणून घेत रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
बालेवाडी-बाणेर परिसरात वाहतुकीची मोठी वर्दळ असल्याने खराब झालेल्या रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून रस्ते सुरक्षित करावेत, अशी मागणी श्री मोरेश्वर बालवडकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.



More Stories
पुणेमहानगर पालिका हद्दीत‘अपघातग्रस्त नागरिक सहाय्यता धोरण’ राबवावे, नगरसेवक अमोल बालवडकरांचा स्थायी समितीकडे प्रस्ताव…
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*