पुणे :
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त बाणेर, बालेवाडी आणि औंध-पाषाण परिसरातील व्यापाऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही अन्नदानाची परंपरा कायम राखत वारकऱ्यांसाठी साडेतीन हजार उपवासाचे पदार्थांच्या पाकिटांचे वितरण केले. गेल्या पंधरा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला हा उपक्रम यावर्षीही मोठ्या उत्साहात पार पडला.
वारकऱ्यांच्या सोयीचा विचार करून सर्व उपवासाचे पदार्थ स्वतंत्रपणे पॅक करून प्रत्येक दिंडीपर्यंत पोहोचविण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अन्नदानाचे वाटप सुरू होते. प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने अन्नदान पाकिटे देण्यात आली.
यावेळी व्यापाऱ्यांनी भक्तिमय वातावरणात “राम कृष्ण हरी” या नामाचा जप करत वारकऱ्यांची सेवा केली. या उपक्रमामुळे पालखी मार्गावर भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी ही आमच्यासाठी भाग्याची बाब असून, ही अन्नदानाची परंपरा यापुढेही कायम ठेवली जाणार आहे.


More Stories
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*