November 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्यांचा दिवाळी स्नेहमेळावा; बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचा दरवर्षी प्रमाणे अनोखा उपक्रम

बालेवाडी :

पुणे महापालिका, अग्निशमन दल, पोलीस दल, महावितरण, एमएनजीएल, महापालिका आरोग्य विभाग, स्वच्छ, सिद्धिविनायक, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि पत्रकार मित्र यांच्या बरोबर दरवर्षी बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे सदस्य दिवाळी साजरी करतात. नागरिकांच्या दैनंदिन जीवनात याच संस्थांचे अधिकारी, जवान व कर्मचारी खऱ्या अर्थाने प्रकाश निर्माण करीत असतात. फेडरेशनला याची जाणीव आहे.

यावर्षीच्या कार्यक्रमात बाणेर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पी. आय. मांढरे मॅडम, शिक्षणमहर्षी गणपतराव बालवडकर, नदी व पर्यावरण बचावचे सुधाकर धनकुडे, वसुंधरा चे पांडुरंग भुजबळ, लायन्स क्लबचे पराग पाटील, ॲड तृप्ती जाधव, महावितरणचे अभियंता सोमनाथ पठाडे, अग्निशमन दलाचे जवान विष्णू व मोहनराव, औंध वार्ड ऑफिसचे कालिदास पडाळे, मनपा आरोग्य निरीक्षक प्रमोद उकिर्डे, विशाल आदमाने व त्यांचा स्टाफ, स्वच्छ आणि सिद्धिविनायक चे निरिक्षक व कर्मचारी, पत्रकार गुणवंतराव जाधवर, मोहसिन शेख आणि आकाश जाधवर अशा अनेक सन्माननीय व्यक्तींनी उपस्थित राहून फेडरेशनच्या कामाचे कौतुक केले. 

फेडरेशनचे उपाध्यक्ष मोरेश्वर बालवडकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले “चोऱ्या आणि घरफोडी पेक्षा सायबर क्राईमचा धोका अनेक पटीने वाढला असल्याने नागरिकांनी सावध राहिले पाहिजे.”

सन्माननीय पाहुण्यांनी आणि फेडरेशनच्या सदस्यांनी दिवाळी फराळाचा एकत्र आस्वाद घेतला. शकिल सलाटी यांनी उपस्थितांचे आणि एलाईट एंपायर सोसायटी सदस्यांचे हार्दिक आभार मानले. 

सोहळा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.

फेडरेशनचे दफेदार सिंह, वैभव आढाव, शैलेश पाटील, आशिष कोटमकर, इंद्रजित कुलकर्णी, विकास कामत, आदिती समुद्र, रूपाली रायकर, योगेश डुंबरे, रमेश रोकडे, राजीव शहा, यश चौधरी यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.